नवीन शाखा वेद मंदिर, प्लॉट क्र. 224, सेकंड स्टेज, राणी चन्नम्मानगर येथे कार्यरत
बेळगाव : लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑप. सोसायटीच्या राणी चन्नम्मानगर शाखेचा स्थलांतर सोहळा सोमवारी 10 नोव्हेंबर रोजी उत्साहात पार पडला. नव्या कार्यालयाचे उद्घाटन ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक राजेंद्र कलघटगी यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. त्यानंतर दीपप्रज्वलनाचा शुभारंभ करून सोहळ्यास औपचारिक सुरुवात झाली. कार्यक्रमाला लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑप. सोसायटीचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. किरण ठाकुर, उपाध्यक्ष अजित गरगट्टी, संचालक गजानन धामणेकर, पंढरी परब, विठ्ठल प्रभू, स्वातंत्र्यसैनिक राजेंद्र कलघटगी, सीएसओ कर्नल दीपक गुरुंग, प्रादेशिक व्यवस्थापक राघवेंद्र नवळी, साहाय्यक प्रादेशिक व्यवस्थापक संतोष कृष्णाचे आणि शाखा व्यवस्थापक ज्योती रेगे आदी कार्यक्रमाला उपस्थित होते. याप्रसंगी डॉ. किरण ठाकुर यांनी लोकमान्य सोसायटीच्या 30 वर्षांच्या प्रवासाचा आढावा घेत प्रेरणादायी भाषण केले. संस्थेवरील विश्वास, विकास आणि ग्राहकसेवेवरील कटिबद्धतेची त्यांनी विशेष नोंद घेतली. नवीन शाखेचे ठिकाण वेद मंदिर, प्लॉट क्र. 224, सेकंड स्टेज, राणी चन्नम्मानगर, बेळगाव येथे असून उद्घाटन सोहळ्याला सर्व ग्राहक, सभासद आणि कर्मचारी उपस्थित होते.









