बेळगाव : लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटीच्या तिसरे रेल्वेगेट, खानापूर रोड येथील शाखेचे आरपीडी कॉलेज कंपाऊंड परिसरात स्थलांतर करण्यात आले. शुक्रवारी एसकेई सोसायटीचे अध्यक्ष विनायक आजगावकर व लोकमान्य सोसायटीचे चेअरमन किरण ठाकुर यांच्या हस्ते स्थलांतर करण्यात आलेल्या शाखेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी लोकमान्य सोसायटीचे हितचिंतक व ठेवीदारांनी कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवून शुभेच्छा दिल्या. मान्यवरांच्या हस्ते फीत कापून नव्या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी बोलताना चेअरमन किरण ठाकुर यांनी लोकमान्य सोसायटीच्या प्रगतीचा आढावा घेतला. लोकमान्य सोसायटीने मागील 28 वर्षात ग्राहकांचा विश्वास संपादन केला आहे. त्यामुळेच डिपॉझिटपेक्षाही अधिक रकमेची मालमत्ता संस्थेजवळ आहे. रियल इस्टेटमध्ये लोकमान्य अग्रेसर असल्याने प्रत्येक ठेवीदारांचा पैसा आपल्याकडे सुरक्षित असल्याचे त्यांनी सांगितले. कोणताही उद्योग अथवा व्यवसाय सुरू करताना कर्जाची गरज ही लागतेच. त्यामुळे कर्ज घेऊन त्याचा योग्यवेळी परतावा केल्यास उद्योग भरभराटीला येऊ शकतो, असेही ते म्हणाले.
राष्ट्रीयीकृत बँकेप्रमाणे लोकमान्य सोसायटीची घोडदौड
विनायक आजगावकर यांनी लोकमान्य परिवाराला शुभेच्छा देत एखाद्या राष्ट्रीयीकृत बँकेप्रमाणे लोकमान्य सोसायटीची घोडदौड सुरू असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले. यावेळी व्हा. चेअरमन अजित गरगट्टी, संचालक सुबोध गावडे, विठ्ठल प्रभू, गजानन धामणेकर, पंढरी परब, डॉ. डी. पी. वागळे, सीएफओ वीरसिंग भोसले, सीएसओ निवृत्त कर्नल दीपक गुरुंग उपस्थित होते. चेअरमन किरण ठाकुर यांच्या हस्ते ठेवीदारांचा सत्कार करण्यात आला. राजश्री मुदासी, संपत खांडेकर, रघुनाथ खांडेकर, नीळकंठ चौगुले, सदानंद गौंडवाडकर, चिंतामणी किल्लेकर, जीएसएस कॉलेजचे प्राचार्य बी. एल. मजुकर यांचा सत्कार करण्यात आला. सीए अविनाश दीक्षित, श्रीनाथ देशपांडे, श्रीकृष्ण प्रभू, मधुकर सामंत यांनी शुभेच्छा दिल्या. सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी राजू नाईक यांनी केले. शाखा व्यवस्थापक पल्लवी शानभाग यांनी आभार मानले.









