क्रीडा प्रतिनिधी /मडगाव
यूथ ऑफ कुडतरी संघाचा टायब्रेकरवर 5-4 असा पराभव करून एजे कुंबोर्डा संघाने शेपर्ड 2022 कुडतरी कप फुटबॉल स्पर्धेचे जेतेपद मिळविले. या स्पर्धेचे आयोजन गुड शेपर्ड ट्रस्टने कुडतरीच्या सेंट आलेक्स चर्च मैदानावर करण्यात आले होते.
पूर्ण वेळेत सामना 1-1 असा बरोबरीत संपला. सामन्याच्या 10व्या मिनिटाला मॅक्सन फर्नांडिसने गोल करून एजे कुंबोर्डा संघाने आघाडी घेतली. त्यानंतर अँथनीने यूथ ऑफ कुडतरी संघाचा बरोबरीचा गोल केला. त्यानंतर टायब्रेकरवर एजे कुंबोर्डासाठी मायरन, प्रॅडी, वॅरोन व मॅक्सनने तर पराभूत यूथ ऑफ कुडतरी संघाच्या लॅझ्ली, रायन व मिलाग्रीसने गोल केले. बक्षीस वितरण कुडतरीचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांच्या हस्ते झाले.
वैयक्तिक बक्षीस याप्रमाणेः अंतिम सामन्यातील पहिला गोल – मॅक्सन फर्नांडिस (एजे कुंबोर्डा), स्पर्धेतील उदयोन्मुख खेळाडू- अँथनी फर्नांडिस (यूथ ऑफ कुडतरी), स्पर्धेतील उत्कृष्ट गोलरक्षक- जॉन्सन बोगोट (एजे कुंबोर्डा), अंतिम सामन्यातील सामनावीर – ऍलिस्टन फर्नांडिस (एजे कुंबोर्डा), उत्कृष्ट डिफेंडर – मायसन फर्नांडिस (यूथ ऑफ कुडतरी).









