आमदार विजय सरदेसाई यांच्या मागणीनंतर मुख्यमंत्र्यांची घोषणा
पणजी : राज्यातील मोटरसायकल पायलटांसाठी लवकरच त्यांच्या थांब्यांवर छोट्या छोट्या शेड्स उभारल्या जातील, अशी घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल सोमवारी राज्य विधानसभेत केली. राज्य विधानसभेत शून्य प्रहाराला आमदार विजय सरदेसाई यांनी मोटरसायकल पायलटांसाठी आपण साधी शेड देखील उभाऊन देत नाही, याबाबत खंत व्यक्त केली. गोव्यातील पायलट हे देशात एक अप्रूप ठरते. अशा या पायलटांची संख्या अगोदर 2500 होती आज ती केवळ 1500 झालेली आहे. मुख्यमंत्री असताना मनोहर पर्रीकर यांनी ऊन, पाऊस, वारा यापासून थोडे संरक्षण मिळावे याकरीता ते ज्या ज्या ठिकाणी आपला स्टॅण्ड म्हणून उभे असतात त्या त्या ठिकाणी शेड उभाऊन देऊ, अशी घोषणा केली होती. त्याची सुऊवात पणजी बस स्थानकावऊन पायलट प्रोजेक्ट म्हणून करू व नंतर संपूर्ण गोवाभर करू असे आश्वासन दिले होते व अर्थसंकल्पातूनही घोषित केले होते. त्यांचे हे स्वप्न पूर्ण करा, अशी आग्रही मागणी विजय सरदेसाई यांनी केली. उत्तरादाखल मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी पायलटांसाठी पेन्शन योजना लागू केलेली आहे. शेड्स उभारणीचे काम लवकरच कऊ आणि विजय सरदेसाई यांनी केलेल्या सूचनेनुसार शक्य झाले तर सीएसआर अंतर्गत काही उद्योग आस्थापनांकडून देखील त्या प्रायोजित कऊन घेऊ, असे आश्वासन सभागृहात दिले.









