बांदा येथे प्रलंबित क्रीडासंकुल प्रकल्प रेंगाळत असल्याने बांदा वासीय करणार उपोषण
बांदा प्रतिनिधी
बांदा येथे क्रीडा संकुल व्हावे यासाठी गेली सहा वर्षे आपण झटत आहोत. तत्कालीन क्रीडा मंत्री विनोद तावडे यांनी क्रीडा संकुलाला मंजुरी दिली होती तर तत्कालीन बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी बांदा येथे सार्वजनिक बांधकाम विभागाची असलेली तेरा एकर जागा क्रीडा विभागाला वर्ग करण्याचे आदेश दिले होते.त्यानंतर मविआचे सरकार आले त्यामुळे भाजपच्या मागणी कडे दुर्लक्ष झाले मात्र आता केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता असतानाही आमच्या मागणीची पूर्तता होत नसल्याने मी भाजपचा सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून भाजपच्या विरोधात क्रीडा संकुलचा प्रश्न मार्गी लागण्यासाठी येत्या 15 ऑगस्ट रोजी बांदा वासीयांन समवेत आपण ओरस येथे आमरण उपोषण करीत आहे.क्रीडासंकुल साठी हा माझा शेवटचा प्रयत्न असून ही आरपारची लढाई असेल त्या दिवशी हा निर्णय न लागल्यास मी राजकारणातून निवृत्ती घेईन असे स्पष्ट मत माजी पंचायत समिती सभापती शीतल राऊळ यांनी आयोजित पत्रकार परिषदेतुन मांडले तर या उपोषणात बांदा शेजारील सर्व ग्रामस्थांनी सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले.
गेली सहा वर्षे बांदा येथे क्रीडा संकुल विषयी बांदा भाजपच्या वतीने योग्य तो पाठपुरावा केला जात आहे मात्र सदरचे क्रीडासंकुल सावंतवाडी की बांदा असा वाद तयार झाला त्यामुळे ते रखडून राहिले त्याच पश्वभूमीवर माजी सभापती शीतल राऊळ यांनी पत्रकार परिषद घेतली यावेळी उपसरपंच जावेद खतीब, माजी ग्रामपंचायत सदस्य हुसेन मकानदार आदी उपस्थित होते.









