ऑनलाईन टीम / तरुण भारत :
शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे यांचा एक आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, त्यावरुन राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. व्हायरल व्हिडिओप्रकरणी शीतल म्हात्रे यांनी ठाकरे गटावर आरोप केले आहेत. त्यावर ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी विधानसभेत भाष्य केले आहे.
दानवे म्हणाले, सुर्वे यांचा तो व्हिडिओ मलाही व्हॉटसऍपवर आला होता. मी तो पुढे दहा जणांना फॉरवर्ड केला. जवळपास 32 देशात तो पाहिला गेला. यूटय़ूबवर हा व्हिडिओ 30 लाख लोकांनी पाहिला. या प्रकरणी निरपराध लोकांवर कारवाई केली जात आहे. एका आमदाराचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या प्रकरणाची चौकशी व्हायला हवी. पोलिसांनी हा व्हिडिओ करणाऱ्या तरुणाचे फेसबुक चेक करावे, त्या व्हिडिओचा तपास करावा. त्यामधून समजेल हा व्हिडिओ मॉर्फ आहे की खरा आहे. निरापराधांवर कारवाई नको. आमदार प्रकाश सुर्वे यांच्या मुलाने फेसबुक पेजवरुन हा व्हिडिओ का डिलीट केला? त्याचीही चौकशी व्हायला हवी, असेही दानवे यांनी म्हटले आहे.
अधिक वाचा : पत्नीने घटस्फोटासाठी अर्ज करताच चिडलेल्या पतीने पेटवल्या पार्किंगमधील गाड्या
दरम्यान, या प्रकरणी म्हात्रे यांनी पोलिसांत तक्रार दिली असून, पाच जणांना अटक करण्यात आली आहे.








