सांगली प्रतिनिधी
येथील शीतल दिलीप गोखले (रा. सांगली) हिने नुकत्याच युपीएससी मार्फत घेतल्या जाणाऱ्या इंडियन इंजिनिअरिंग सर्व्हिस(आय.ई.एस.) परीक्षेत महाराष्ट्रात प्रथम क्रमांक मिळवून उज्वल यश संपादन केले.
केंद्र शासनाच्या इंडियन इंजिनियरिंग सर्व्हिस मध्ये पाहिलाच्या प्रयत्नात तिने हे यश मिळवले, यासाठी तिने स्वअध्ययन करून हे यश मिळवले आहे. तिला आई श्रीमती दिशा गोखले, काका सुधीर गोखले यांचे मार्गदर्शन लाभले. तिची गोवा येथे रिजनल रेल्वे ऑफिसर पदावर नियुक्ती झाली आहे.सांगलीतून राज्यात पहिली आल्याने सर्व स्तरातून तिचे कौतुक होत आहे. यापुढील काळात मराठी विद्यार्थ्यांचा यूपीएससी मध्ये सहभाग वाढण्यासाठी इतर विद्यार्थ्यांना आयईएस परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना ती सामाजिक जबाबदारी म्हणून मार्गदर्शन करणार आहे.








