पाणी देखील पित नाही महिला
अन्नपाण्याशिवाय माणूस जिवंत राहणे अशक्य आहे. परंतु एका महिलेने मागील 8 वर्षांपासून अन्नाचा एक कणही ग्रहण केलेला नाही. सर्वात आश्चर्याची बाब म्हणजे ही महिला पेशाने शेफ आहे, दररोज लोकांसाठी रेस्टॉरंटमध्ये ती खाद्यपदार्थ तयार करत असते तरीही तिला ते खाता येत नाहीत.

ब्रिटनच्या डॉर्सेट येथे राहणारी 31 वर्षीय लॉरेटा हार्म्स एक शेफ आहे. इतरांना ती चांगले चांगले खाद्यपदार्थ खाऊ घालते. परंतु स्वत: कधीच खाऊ शकत नाही. चुकून काहीच खाल्ले तर तिला जीवघेण्या वेदनांना सामोरे जावे लागते. 8 वर्षांपासून तिने काहीच खाल्ले नाही. तिचे बालपण इतर मुलांसारखेच होते. तिला सर्वकाही खाणेपिणे शक्य होते, परंतु खाल्यावर अचानक तिच्या पोटात वेदना होऊ लागली होती. कधीकधी पोट बिघडले तरीही ती खात राहायची. लॉरेटा अत्यंत खादाड होती, याचमुळे ती शेफ देखील झाली. परंतु आता तिला स्वत: तयार केलेल्या खाद्यपदार्थांची चव देखील चाखता येत नाही. वयाच्या 18 व्या वर्षी एकेदिवशी तिच्या पोटात असह्या वेदना होऊ लागल्या. यानंतर ती डॉक्टरकडे गेली होती. डॉक्टरांनी तपासणी करत नेमका आजार काय याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. तिने स्वत:चा आहार बदलला, परंतु तरीही तिला कुठलाच लाभ झाला नाही. 2015 मध्ये तिला एहलर्स-डॅनलोस सिंड्रोम असल्याचे निदान झाले, यामुळे तिला गॅस्ट्रोपेरिएसिस आजार झाला आहे. पोटात अन्न पचवून ते छोट्या आतड्यांपर्यंत पोहोचविले जात नाही. यामुळे ती जे काही खायची, ते तिच्या पोटातच राहत होते.

तरीही जिवंत कशी
तिचे खाणेपिणे बंद झाले तरीही ती जिवंत कशी हा प्रश्न उपस्थित हेणे स्वाभाजिक आहे, प्रत्यक्षात एक ट्यूब तिच्या हृदयानजीक शरीराच्या आत सोडण्यात आली आहे. या ट्यूबच्या मदतीने आवश्यक पोषण घटकांना पदार्थांद्वारे थेट तिच्या रक्तात सोडले जाते. दरदिनी 18 तासांसाठी ती एका बॅगचा वापर करते, ज्यात द्रवपदार्थ असतो, बॅगेतील पदार्थात प्रोटीन, कार्बोहायड्रेट, फॅट्स, व्हिटॅमिन्स, मिनरल्स आणि इलेक्ट्रोलाइटचा अंतर्भाव असतो. स्वत: काहीच खात नसली तरीही कुकिंग हे तिचे पॅशन आहे. याचमुळे ती इतरांसाठी खाद्यपदार्थ तयार करते. अनेकदा ती इतकी कमजोर होते, की तिला व्हिलचेअरची गरज भासते. अनेकदा ट्यूब बदलतेवेळी तिला इंफेक्शन देखील होते, तरीही ती जीवनात आनंदी आहे.









