पुणे : कसबा पोटनिवडणुकीच्या मतदानासाठी लंडनहून अमृता महाजन आज पुण्यात आली. पुण्यात आल्यावर तिने आपल्या घरी जाण्यापूर्वी भाऊ विक्रांत देवकर यांच्यासमवेत सकाळी 9.30 वाजता मतदानाचा हक्क बजावला. त्यावेळी तिने विविध आठवणींना उजाळा दिला.
ती म्हणाली, माझे लहानपण पुण्यात गेले. मी आता लंडनमधील मँचेस्टर येथे राहते. खास मतदानासाठी मी आज सकाळी पुण्यात आले. मतदान करणं हे आपलं राष्ट्रीय कर्तव्य आहे, ते सर्वांनी बजावले पाहिजे. मतदानाचा हक्क कोणीही गमावू नका, असा संदेशही तिने यावेळी पुणेकरांना दिला.
अधिक वाचा : कसब्यात दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; कौल कुणाला?








