वृत्तसंस्था / नवी दिल्ली
31 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या विजय हजारे करंडक क्रिकेट स्पर्धेसाठी घोषित करण्यात आलेल्या मुंबई संघामध्ये सलामीचा फलंदाज पृथ्वी शॉ ला वगळण्यात आला आहे.
मध्यंतरी रणजी स्पर्धेतही त्याला तंदुरुस्तीच्या समस्येवरुन काही सामन्यांमध्ये खेळता आले नव्हते. त्यानंतर शॉचे पुनरागमन मुंबई संघात सय्यद मुस्ताकअली क्रिकेट स्पर्धेसाठी झाले आणि मुंबईने सय्यद मुस्ताकअली क्रिकेट स्पर्धा नुकतीच जिंकली आहे. विजय हजारे करंडक स्पर्धेसाठी घोषित करण्यात आलेल्या मुब्ंाई संघाचे नेतृत्व श्रेयेस अय्यरकडे सोपविण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी मुंबई संघाच्या मोहीमेला अहम्मदाबाद येथे 21 डिसेंबरपासून कर्नाटक विरुद्धच्या सामन्याने होणार आहे.
मुंबई संघ: श्रेयेस अय्यर (कर्णधार), आयुष म्हात्रे, रघुवंशी, जय बिस्ता, सुर्यकुमार यादव, शिवम दुबे, सुर्यांश शेडगे, सिद्धेश लाड, तेमोरे, प्रसाद पवार, अथर्व अंकोलेकर, तनुष कोटीयान, शार्दुल ठाकुर, रॉयस्टन डायस, जुनेद खान, हर्ष तन्ना आणि विनायक भोर









