Shambhuraj Desai On Shashikant Shinde : उध्दव ठाकरे महाविकास आघाडीत गेल्याने त्याचा फायदा राष्ट्रवादी आणि काँग्रेसलाच झालाच. तुम्ही त्यांचे वारसदार असाल पण बाळासाहेब ठाकरे यांना कुटुंबापुरतं मर्यादित आणि संकुचित ठेवू नका.जे आरोप करत आहेत त्यांची नार्को टेस्ट करा म्हणजे कोणाकडे खोके गेले कोणाकडे फ्रिज गेले हे कळेल अशी टीका पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केली. आज ते साताऱ्यात बोलत होते. आमदार शशिकांत शिंदे यांनी अर्थसंकल्पाचा बारकाईने अभ्यास करावा असा सल्ला ही शंभूराज देसाई यांनी दिला. गेल्या अडीच वर्षात राज्याचे प्रस्ताव केंद्राकडे न गेल्याने निधी पडून राहिला असल्याचेही ते म्हणाले.यावेळी त्यांनी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावरही निशाणा साधला.
यावेळी बोलताना ते म्हणाले की, मीडियाने संजय राऊतांना टीव्हीवर दाखवण कमी करा. संजय राऊत सकाळी टिव्हीवर आले की लोक चॅनल बदलतात याचा सर्व्हे करा. जिल्ह्यात अशी नियंत्रण व्यवस्था होत असेल तर मी याचे सॅम्पल करून दाखवतो असे आवाहन शंभूराज देसाई यांनी दिले. यावेळी बोलताना ते म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारच्या काळात उपलब्ध निधी 100 रुपयांचा असायचा आणि मंजुऱ्या 1000 रुपयांच्या असायच्या याउलट या सरकारच्या काळात आमच्याकडे असणारे उत्पन्न, वर्षातून येणारा निधी त्यासाठी लागणारी तरतूद करण्यात आल्याचेही ते म्हणाले.
आमदार शशिकांत शिंदे काय म्हणाले
साडेसहा लाख कोटींचा राज्याचा अर्थसंकल्प नुकताच सादर झाला. त्या अर्थसंकल्पात योजनांच्या घोषणांचा सुळसुळाट होता;पण त्याला पैसा कोठून उभा करणार हा प्रश्न आहे. यातील बहुतांशी योजना केंद्राच्या असून, त्यांच्याकडून पैसे कधी येतील, त्यावर या योजनांचे भवितव्य अवलंबून आहे. अद्यापही त्यांनी राज्याचा जीएसटी परतावा दिलेला नाही. आपण परत एकदा कर्ज काढण्याच्या बाबतीत निर्णय घेतला आहे. साडेसात हजार कोटींच पुरवणी बजेट त्यांनी मार्चमध्ये बजेटच्या दिवशीच आणले म्हणजेच सरकार फेल्युलर आहे.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी









