एस्सार समुहाचे सहसंचालक
मुंबईः
एस्सार समुहाचे सहसंचालक उद्योगपती अब्जाधिश शशिकांत रुईया यांचे वयाच्या ८१ व्या वर्षी निधन झाले. उद्योगक्षेत्रात १९६९ मध्ये रुईया बंधुनी बांधकाम कराराने सुरुवात केली. त्यानंतर एस्सार ऊर्जा, पोलाद आणि दूरसंचार अशा विविध क्षेत्रात विस्तार केला. व्यावसायिक विस्तार करताना आर्थिक आव्हानांचा सामना करत रुईयांनी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय मंचावर महत्त्वपूर्ण भूमिका बजावल्या.
त्यांचे पार्थिव आज (दि. २६ रोजी) दुपारी १ ते ३ दरम्यान अंत्यदर्शनासाठी रुईया हाऊस येथे ठेवण्यात येणार आहे. त्यांच्यावर दुपारी ४.३० वाजता मलाबार हिल, मुंबई येथे अंत्यसंस्कार होतील.








