पणदूर / वार्ताहर
कुडाळ तालुक्यातील अणाव गावचे रहिवासी व वेताळ बांबर्डे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे चेअरमन शशिकांत सुंदर अणावकर (८५) वर्षे यांचे रविवारी पहाटे पणदूरतिठा येथील निवासस्थानी निधन झाले.वेताळ बांबर्डे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे गेली २३ वर्षे अध्यक्ष होते. तत्पूर्वी ३३ वर्षे त्यांनी या संस्थेचे सचिवपद सांभाळले होते. शिवाजी इंग्लिश स्कूल, दादासाहेब तिरोडकर कनिष्ठ महाविद्यालय, पद्मश्री बाबासाहेब वेंगुर्लेकर उभारण्यात व नावारूपाला आणण्यास त्यांचा सिंहाचा वाटा आहे. गेली ५५ वर्षे त्यांनी शैक्षणिक कार्यासाठी वाहून घेतले होते.
राजकिय, सामाजिक जीवनातही ते प्रेरणादायी व्यक्तिमत्व होते. अणाव गावचे ते २४ वर्षे सरपंच होते तसेच ते पंचायत समिती सदस्यही होते. काँग्रेस पक्षात त्यांनी विविध पदांवर काम केले होते. संजय गांधी निराधार योजना मंडळ अध्यक्ष, जिल्हा खादी ग्रामोद्योग मंडळ अध्यक्ष, राज्य समिती सदस्य अशा विविध पदांवर त्यांनी काम केले होते. त्यांच्या २०१२ ते २०१३ या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त प्रकाशित करण्यात आले ल्या गौरव विशेषांकास माजी मुख्यमंत्री नारायण राणे, पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच विनोद तावडे , हुसेन दलवाई, राजेंद्र दर्डा, सदाशिवराव मंडलिक, प्रमोद जठार यांनी त्यांच्या शैक्षणीक, सामाजिक, राजकीय कार्यांची दखल घेत गौरव करीत शुभेच्छाही दिल्या होत्या. जिल्ह्यातील शैक्षणीक संस्थांचे ते मार्गदर्शक होते. आपल्या राजकिय नेत्यांच्या ओळखीचा उपयोग करून घेत त्यांनी शैक्षणीक सोयी सुविधा उपलब्ध करून घेतल्या. त्यांच्या निधनाने शैक्षणीक शेत्रात पोकळी निर्माण झाली आहे.तसेच अणाव दशक्रोशित शोककळा पसरली.









