न्हावेली / प्रतिनिधी
न्हावेली टेंबवाडी येथील रहिवासी शशिकला शशिकांत परब (७३) यांचे शनिवारी दुपारी २ वाजता अल्पशा आजाराने राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या पश्चात पती,पाच मुलगे,सूना,दीर,भावजय,नातवंडे असा परिवार आहे.माजी सरपंच शशिकांत परब यांच्या त्या पत्नी तर दैनिक तरुण भारतचे पत्रकार नीलेश परब यांच्या त्या आई होत.









