गुरु हिरेमठनंतर शशांक हा बेळगावचा दुसरा खेळाडू
क्रीडा प्रतिनिधी/बेळगाव
ओडीशा भुवनेश्वर येथे घेण्यात आलेल्या ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी अॅथेलेटिक स्पर्धेत खानापूरचा सुपुत्र शशांक गंगाधर पाटील याने भालाफेक स्पर्धेत 74.58 मी. फेक करत रौप्य पदक पटकाविले. गुरु हिरेमठनंतर इंटर युनिव्हर्सिटीला पदक मिळविणारा शशांक हा दुसरा खेळाडू आहे.
भुवनेश्वर येथे झालेल्या या स्पर्धेत शशांक पाटीलने पहिल्या फेकीत 72.98 मी. इतके अंतर गाठले. दुसऱ्या फेकीत 74.58 फेक करीत पहिल्या स्थान गाठले होते. तिसरा व चौथा फेक फॉल झाली. पाचव्या फेकीत 73.93 तर सहाव्या फेकीत 73.21 मी. इतकी फेक केली. पंजाब विद्यापीठाच्या सागरने 80 मी.ची फेक करत प्रथम क्रमांकासह सुवर्णपदक पटकाविले. तर शशांकने दुसरा क्रमांक पटकाविला.
यापूर्वी म्हैसूर दसरा स्पर्धेत शशांक पाटीलने 76.92 इतकी फेक करीत सुवर्ण पदकासह विक्रम नोंदविला होता. पण युनिव्हर्सिटी स्पर्धेत त्याला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. खानापूर तालुक्यातील चुंचवाड गावातील शेतकरी कुटुंबातील शशांक असून त्याचे यशामुळे सर्वत्र अभिनंदन होत आहे. त्याला पुढील शशांक गंगाधर पाटील, युवजन क्रीडा खात्याचे अॅथेलेटिक प्रशिक्षक संजीव नाईक, संघ व्यवस्थापक रामराव, फिटनेस प्रशिक्षक बसवराज भुसन्नावर यांचे मार्गदर्शन तर अॅथलेटिक प्रशिक्षक ए. बी. शिंत्रे, मधुकर देसाई, युवजन क्रीडा अधिकारी श्रीनिवास बी. यांचे प्रोत्साहन लाभत आहे.









