जॉन अब्राहम मुख्य भूमिकेत
बॉलिवूडचा हँडसम हंक जॉन अब्राहम हा निखिल अडवाणी यांचा आगामी चित्रपट ‘वेदा’मध्ये दिसून येणर आहे. जॉन यापूर्वी शाहरुख खानचा चित्रपट ‘पठान’मधून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटातील जॉनच्या अभिनयाचे कौतुक झाले होते. जॉन 2019 चा अॅक्शन थ्रिलर ‘बाटला हाउस’नंतर पुन्हा एकदा निखिल अडवाणीसोबत काम करत आहे. या चित्रपटात जॉनसोबत मराठमोळी अभिनेत्री शर्वरी वाघ दिसून येणार आहे.

झी स्टुडिओ, एम्मी एंटरटेनमेंट आणि जेए एंटरटेनमेंटकडू एकत्रितपणे या चित्रपटाची निर्मिती होत आहे. वेदा चित्रपटात जॉन एका रेस्क्यूअरची भूमिका साकारत आहे. चित्रपटाचे चित्रिकरण राजस्थानात सुरू झाले आहे. जॉन अन् शर्वरीचा हा चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित होणार असल्याचे मानले जात आहे. शर्वरीने बंटी और बबली 2 या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले होते. शर्वरीचे नाव सध्या सनी कौशल या अभिनेत्यासोबत जोडले जात आहे.
शर्वरी आणखी काही चित्रपटांमध्ये काम करत आहे. शर्वरी सोशल मीडियावर अत्यंत सक्रीय असून स्वत:चे ग्लॅमरस फोटोज ती वारंवार शेअर करत असते. सोशल मीडियावर तिचा चाहतावर्गही मोठ्या प्रमाणात वाढला आहे.









