सुरज बडजात्या हे अभिनेता आयुष्मान खुरानासोबत एका नव्या चित्रपटावर काम करत आहेत. बडजात्या यांनी आयुष्मानला एक समर्पित आणि उत्तम अभिनेता संबोधिले आहे. बडजात्या यांनी या चित्रपटाचे चित्रिकरण मुंबईत लवकरच सुरू होणार आहे. या चित्रपटात आयुष्मानची नायिका म्हणून शर्वरी वाघची निवड करण्यात आली आहे. या चित्रपटाची कहाणी मुंबईवरच आधारित आहे. या चित्रपटात आणखी काही कलाकार असून त्यांच्या वाट्यालाही महत्त्वाची भूमिका येणार असल्याचे बडजात्या यांनी सांगितले आहे.
प्रत्येक चित्रपटाचे चित्रिकरण सुरू करण्यापूर्वी मी काहीसा अस्वस्थ असतो. ‘मैंने प्यार किया’ या चित्रपटाच्या वेळी देखील असेच घडले होते. एक निर्माता म्हणून चित्रपट बॉक्स ऑफिसवर किती कमाई करेल हे महत्त्वाचे नाही, तर चित्रपटातील मागील विचार प्रेक्षकांपर्यंत पोहोचतोय की नाही हे माझ्यामते महत्त्वाचे असते असे बडजात्या यांनी म्हटले आहे. आयुष्मान सध्या रश्मिका मंदानासोबत ‘थामा’ चित्रपटाचे चित्रिकरण करत आहे. हा चित्रपट मॅडॉकच्या हॉरर कॉमेडी युनिव्हर्सचा हिस्सा असून तो दिवाळीच्या आसपास प्रदर्शित होणार आहे. याचबरोबर आयुष्मान हा करण जौहरच्या चित्रपटात दिसून येणार आहे. तर शर्वरी ही आलिया भट्टसोबत वायआरएफ स्पाय युनिव्हर्सच चित्रपट ’अल्फा’मध्ये मुख्य भूमिका साकारत आहे. हा चित्रपट नाताळाच्या आसपास प्रदर्शित होणार आहे.









