हैदराबाद
वायएसआरटीपीच्या प्रमुख वायएस शर्मिला यांना पोलिसांनी खबरदारीदाखल बुधवारी ताब्यात घेतले. शर्मिला या महिलांच्या विरोधात होत असलेल्या गुन्हय़ांप्रकरणी बंड टँक येथे तेलंगणा सरकारच्या विरोधात धरणे आंदोलन करत होत्या. शर्मिला यांना प्रारंभी बोलाराम पोलीस स्थानकात नेण्यात आले. त्यानंतर तेथून त्यांना लोट्स पोंड येथील त्यांच्या निवास्थानी हलविण्यात आल्याचे समजते. तेलंगणात चालू वर्षाच्या अखेरीस विधानसभा निवडणूक होणार असल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे. वायएसआरटीपी देखील या निवडणुकीत सहभागी होणार आहे.









