अन्य गुन्हय़ांमुळे तुरुंगातच राहावे लागणार
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
जामिया मिलिया इस्लामिया युनिव्हर्सिटी 2019 च्या हिंसाचार प्रकरणात दिल्ली न्यायालयाने शरजील इमाम आणि आसिफ इक्बाल तन्हा यांची निर्दोष मुक्तता केली आहे. मात्र, शरजीलला अजूनही तुरुंगातच राहावे लागणार आहे. दिल्ली दंगलीच्या कट प्रकरणातही तो आरोपी असल्यामुळे त्याच्यावर आणखी अनेक एफआयआर दाखल आहेत. तर तान्हा जामिनावर तुरुंगाबाहेर आहे.
इमाम तीन वर्षांपासून तिहार तुरुंगात बंद आहे. चार महिन्यांपूर्वी, दिल्ली न्यायालयाने शरजील इमामला देशद्रोहाच्या खटल्यात 30,000 रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्मयावर जामीन मंजूर केला होता. त्याच्यावर भडकाऊ भाषण केल्याचा आरोप असल्यामुळे 2019 मध्ये जामियानगर भागात हिंसाचार झाला होता. शरजीलच्या वक्तव्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर तो चर्चेत आला होता. त्यानंतर नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात झालेल्या हिंसक निदर्शनांशी संबंधित अनेक प्रकरणांमध्ये त्याला आरोपी करण्यात आले होते. शरजीलला जानेवारी 2020 मध्ये बिहारमधून द्वेषपूर्ण भाषण आणि देशद्रोहाशी संबंधित आणखी एका प्रकरणात अटक करण्यात आली होती.









