मुंबई
फूड डिलीव्हरी क्षेत्रात कार्यरत झोमॅटोचे समभाग बुधवारी शेअरबाजारात तेजीत असताना दिसले आहेत. सदरचे कंपनीचे समभाग 4 टक्के वाढत बीएसईवर बुधवारी इंट्रा डे दरम्यान 119 रुपयांवर पोहचले होते. 357 दशलक्ष समभागांमध्ये बीएसई व एनएसईवर व्यवहार झाल्याचे कळते. रॉयटरच्या माहितीनुसार अलिपे सिंगापूर होल्डिंग यांनी कंपनीतील 3.44 टक्के हिस्सेदारी 3326 कोटी रुपयांना विकली आहे. जुलै ते सप्टेंबरच्या तिमाहीत कंपनीने 36 कोटी रुपयांचा निव्वळ नफा प्राप्त केला होता.









