मुंबई
फूड डिलिव्हरीच्या क्षेत्रात कार्यरत झोमॅटोचे समभाग शुक्रवारी शेअरबाजारात घसरताना दिसले आहेत. कंपनीच्या समभागाचा भाव शुक्रवारी 7 टक्के इतका घसरत बीएसईवर 50 रुपयांवर आला होता. कंपनीच्या तोटय़ात डिसेंबर तिमाहीत वाढ झाल्याचा नकारात्मक परिणाम कंपनीच्या समभागावर शुक्रवारी पाहायला मिळाला. कंपनीने डिसेंबर 2022 च्या तिमाहीत 346 कोटी रुपयांचा तोटा सहन केला आहे. मागच्या वर्षाच्या समान तिमाहीत कंपनीला 67 कोटी रुपयांचा तोटा झाला होता.









