मुंबई
झेन्सार टेक्नॉलॉजीस यांचा समभाग बुधवारी बीएसईवर 5 टक्के इतका वाढत 308 रुपयांवर पोहचला होता. याआधी हा समभाग 293 या भावावर बंद झाला होता. बाजार बुधवारी घसरणीत असतानादेखील झेन्सारच्या समभागाने चमकदार तेजीची कामगिरी नोंदवली आहे. निप्पॉन इंडिया म्युच्युअल फंडने झेन्सारमधला 1.75 टक्के वाटा समभागांच्या रुपात खरेदी केला आहे. आता कंपनीचा एकूण वाटा 5.22 टक्के इतका झाला आहे









