मुंबई
विलगीकरणाच्या निर्णयाचा वेदांता लिमिटेडच्या समभागावर मंगळवारी शेअर बाजारामध्ये सकारात्मक परिणाम पहायला मिळाला. वेदांताचे समभाग मंगळवारी शेअर बाजारात इंट्राडे दरम्यान 4 टक्के वाढत 232 रुपयांवर पोहोचले होते. काही दिवसांपूर्वी वेदांता समुहाने आपल्या विविध कंपन्यांचे विलगीकरण करण्याची घोषणा केली होती. याचा सकारात्मक परिणाम समभागावर पहायला मिळाला. गेल्या दोन दिवसांमध्ये कंपनीचा समभाग 12 टक्के इतका वाढला आहे.









