मुंबई
शीतपेय क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या वरुण बेवरेजिसचा समभाग बुधवारी शेअर बाजारात 2 टक्के इतका वाढलेला दिसला आहे. मार्च तिमाहीतील नफ्यातील कामगिरीमुळे त्याचा सकारात्मक परिणाम समभागावर बुधवारी दिसून आला आहे. दूध उत्पादन, रस आणि स्पोर्ट्स संबंधित पेयांच्या विक्रीमध्ये मागच्या तिमाहीमध्ये चांगली वाढ झाल्याचे दिसले आहे. कंपनीचा समभाग 1432 रुपयांवर असून तो आगामी काळात 1600 चा टप्पा गाठू शकेल असा तज्ञांचा अंदाज आहे.









