मुंबई :
सिमेंट क्षेत्रातली आघाडीवरची कंपनी अल्ट्राटेक सिमेंटचा समभाग शेअरबाजारात सोमवारी तेजीत असताना दिसला आहे. सदरचा समभाग बीएसईवर इंट्रा डे दरम्यान 8499 रुपयांच्या उच्चांकी स्तरावर पोहचला आहे. सोमवारी अल्ट्राटेकचा समभाग जवळपास 2 टक्के इतका वाढलेला पाहायला मिळाला. एप्रिल ते जून या तिमाहीत सिमेंटच्या विक्रीत कंपनीने चांगली वाढ नोंदली असल्याचे सांगितले जात असून त्यामुळे समभाग सोमवारी तेजीत राहिला होता.









