मुंबई :
तेजस नेटवर्क्स लिमिटेडचा समभाग शेअरबाजारात बुधवारी नव्या उंचीवर स्थिर झालेला पाहायला मिळाला. सदरचा कंपनीचा समभाग बुधवारी शेअरबाजारात 7.34 टक्के वाढत 939 रुपयांवर विक्रमी स्तरावर पोहचला होता. तेजसच्या मदतीने इटलीत दूरसंचार पायाभूत सुविधांची यशस्वी सुरुवात करण्यात आल्याच्या बातमीने समभाग वधारताना दिसला आहे. यादरम्यान तेजस नेटवर्क्सचे बाजार भांडवल मूल्य वाढून 15,487 कोटी रुपयांवर पोहचले आहे.









