मुंबई :
टाटा समूहातील टाटा टेक्नॉलॉजीजचा समभाग गुरुवार 30 नोव्हेंबर रोजी शेअरबाजारात लिस्ट होणार आहे. सदरचा कंपनीचा आयपीओ 24 नोव्हेंबरला बंद झाला होता जो 69 पट सबस्क्राइब झाला होता. रिटेल गुंतवणूकदारांनी 16 पट, बिगर संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 62 पट आयपीओ सबस्क्राइब केला होता. जवळपास सर्वच गटातील गुंतवणूकदारांनी कंपनीच्या आयपीओला दमदार प्रतिसाद नोंदवला आहे.









