मुंबई
पोलाद क्षेत्रातील दिग्गज कंपनी टाटा स्टीलचे समभाग शुक्रवारी 4 टक्के वधारले होते. सात सहकारी कंपन्यांच्या विलीनीकरणास संचालक मंडळाने मंजुरी दिल्याने समभाग बाजारात झळाळताना दिसला. शुक्रवारी इंट्रा डे दरम्यान समभागाचा भाव 107 रुपयांवर बीएसईवर पोहोचला होता. कंपनीच्या बाजार भांडवल मूल्यात शुक्रवारी 1.28 लाख कोटींची वाढ दिसली.









