मुंबई :
खाद्यपदार्थ व शितपेयांच्या क्षेत्रात कार्यरत एफएमसीजी कंपनी टाटा कंझुमरचा समभाग बुधवारी तेजीसह शेअरबाजारात उच्चांकी भावावर पोहचण्यात यशस्वी झाला आहे. सदरचा कंपनीचा समभाग बुधवारी बीएसईवर इंट्रा डे दरम्यान 5 टक्के वाढत 863 रुपयांवर पोहचला होता. गेल्या दोन महिन्यात कंपनीचा समभाग 21 टक्के इतका वाढला आहे. कंपनीने मार्चच्या चौथ्या तिमाहीत 14 टक्के अधिक एकत्रित महसूल प्राप्त केला आहे.









