मुंबई :
सुझलॉन एनर्जी या समभागाने शेअरबाजारात कमाल केली आहे. कंपनीने 52 आठवड्याच्या अवधीनंतर नव्या उच्च्चांकी भावावर पोहचण्यात यश मिळवलं आहे. सुझलॉन एनर्जीचा समभाग बुधवारी 4.81 टक्के इतका वाढत 40.50 रुपयांवर व्यवहार करताना दिसला आहे. गेल्या चार सत्रात मात्र हा समभाग 8 टक्के इतका वाढू शकला आहे. एमएससीआयने आपल्या ग्लोबल स्टँडर्ड इंडेक्समध्ये सुझलॉनचा समावेश केला आहे.









