मुंबई
स्टील ट्यूब व पाइपची निर्मिती करणाऱ्या सूर्या रोशनीचा समभाग बुधवारी उच्चांकावर पोहचत व्यवहार करत होता. आगामी काळात चांगला व्यवसाय करू शकणार असल्याच्या शक्यतेचा परिणाम तात्काळ बुधवारी कंपनीच्या समभागावर दिसून आला. बुधवारी बीएसईवर इंट्रा डे दरम्यान 9 टक्के उसळी घेत विक्रमी 972 रुपयांच्या भावावर कंपनीचा समभाग पोहचला होता. यापूर्वी 28 जून 2023 ला समभागाने 934 रुपयांवर उच्चांकी झेप घेतली होती. सलग सहाव्या दिवशी समभाग (एकूण 19 टक्के) तेजीत आहे.









