मुंबई
साखर कंपन्यांचे समभाग बुधवारी जवळपास 10 टक्केच्या आसपास वधारलेले पाहायला मिळाले आहेत. यामध्ये बीएसईवर उत्तम शुगर मिल्सचा समभाग 52 आठवड्याच्या उच्चांकावर पोहचत 10 टक्के वाढीसह 440 रुपयांवर व्यवहार करत होता. दालमिया भारत 8 टक्के वधारत होता तर अवध शुगर, श्री रेणुका शुगर, मगध शुगर, धामपूर शुगर, उगार शुगर यांचेही समभाग 2 ते 8 टक्के या प्रमाणात वधारलेले होते.









