मुंबई :
हवाई क्षेत्रातील कंपनी स्पाइसजेटचे समभाग गेल्या दोन सत्रात घसरणीत होते. पण मंगळवारी मात्र सदरचे कंपनीचे समभाग वधारताना दिसून आले. मंगळवारी शेअरबाजारात इंट्रा डे दरम्यान स्पाइसजेटचे समभाग 4.91 टक्के वाढत 31 रुपयांवर पोहचले होते. याआधीच्या सत्रात कंपनीचे समभाग 29.55 रुपयांवर बंद झाले होते. हवाई क्षेत्रातील नियामक डिजीसीएने स्पाइसजेटवरील पाळत ठेवण्याची मोहिम मागे घेतल्याचे समजते. ज्याचा परिणाम समभागावर सकारात्मक दिसून आला.









