मुंबई
सिग्नेचर ग्लोबल या कंपनीचे समभाग शेअरबाजारात बुधवारी 15 टक्के प्रिमीयमसह लिस्ट झाल्याची माहिती आहे. कंपनीचा समभाग बाजारात बुधवारी 444 रुपये या भावावर खुला झाला आहे. आयपीओची इशु किमत 385 रुपये इतकी निश्चित केली होती. भारतीय बाजारात नकारात्मक कल असतानाही समभाग चांगल्यापैकी लिस्ट झाला आहे. गुंतवणूकदारांना प्रति समभाग 59 रुपये इतका फायदा मिळवता आला आहे.









