मुंबई
वित्त क्षेत्रात कार्यरत कंपनी श्रीराम फायनान्सचा समभाग सोमवारी शेअर बाजारात तेजीत होता. सदरचा कंपनीचा समभाग सोमवारी इंट्रा डे दरम्यान 7 टक्के वाढीसह 1500 रुपयांवर पोहोचला होता. या आधी या समभागाने 25 जुलै 2022 रोजी 1509 या उच्चांकी भावापर्यंत मजल मारली होती. 9.98 दशलक्ष समभागांचा व्यवहार झाल्याचे समजते. श्रीराम समूहातील ही बिगर बँकिंग क्षेत्रातील कंपनी आहे.
स्कीपरच्या समभागाची उच्चांकी झेप
मुंबई : जगातील आघाडीवरची ऊर्जा क्षेत्रातील कंपनी स्कीपरचा समभाग तब्बल 15टक्के इतका तेजीत दिसून आला. कंपनीने 1135 कोटी रुपयांचे कामाचे कंत्राट नुकतेच प्राप्त केल्याचे समजते. या बातमीने समभाग सोमवारी बीएसईवर इंट्रा डे दरम्यान 15 टक्के उसळी घेत 167 रुपयांवर पोहचला होता. 52 आठवड्यानंतर हा समभाग उच्चांकी स्तराकडे आगेकूच करतो आहे. पॉवरग्रिड कॉर्पोरेशनकडून कंपनीला नवी ऑर्डर मिळाली आहे.









