मुंबई
बांधकाम क्षेत्रातील कंपनी शोभा डेव्हलपर्सचा समभाग शेअरबाजारात 4 टक्के इतका वाढताना दिसला. बीएसईवर शुक्रवारी कंपनीचा समभाग 4 टक्के वाढीसह 589 रुपयांवर पोहोचला होता. बांधकाम क्षेत्रातील सदरच्या कंपनीने नुकत्याच संपलेल्या तिमाहीमध्ये विक्रीत दमदार कामगिरी केल्याचे स्पष्ट झाले आहे. मागच्या तिमाहीमध्ये 1 हजार 425 कोटी रुपयांच्या घरांची विक्री करण्यामध्ये कंपनीला यश आले आहे. याचाच परिणाम कंपनीच्या समभागावरती शुक्रवारी सकारात्मक पाहायला मिळाला.









