मुंबई :
सिमेंट उद्योगातील कंपनी सांघी इंमस्ट्रिजचा समभाग बुधवारी शेअरबाजारात 5 टक्के इतका वाढला असल्याचे दिसून आले. अदानी समूहाच्या अंबुजा सिमेंटकडून सदर कंपनीचे अधिग्रहण होणार असल्याच्या बातमीचा परिणाम समभागावर दिसला आहे. सांघी इंडस्ट्रिजचा समभाग बुधवारी 5 टक्के इतका वाढत 100 रुपयांवर पोहचला होता. अशा प्रकारे समभाग 52 आठवड्याच्या उच्चांकावर पोहचला आहे. कंपनीचे बाजारभांडवल मूल्य 2600 कोटी रुपयांवर पोहचले आहे.









