मुंबई
फॅशन उत्पादनांच्या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या साई सिल्क (कलामंदीर) कंपनीचा समभाग फक्त 4 टक्के इतक्या प्रिमीयमसह शेअरबाजारात बुधवारी लिस्ट झाला आहे. गुंतवणूकदारांचा या समभागाला अल्पसा प्रतिसाद लाभला आहे. कंपनीच्या समभागाची इशु किंमत 222 रुपये इतकी असताना 231 रुपये भावावर समभाग एनएसईवर लिस्ट झाला आहे. प्रति समभाग गुंतवणूकदारांना 9 रुपये इतका फायदा झाल्याचे दिसून आले. आयपीओअंतर्गत 600 कोटींचे समभाग सादर करण्यात आले आहेत.









