मुंबई :
रिलायन्स पॉवर लिमीटेड यांचा समभाग बुधवारी काहीसा घसरणीत असताना पहायला मिळाला. या आधीच्या दोन सत्रामध्ये बऱ्यापैकी तेजी राखून होता. गेल्या 6 महिन्यांच्या कालावधीत पाहता समभागांनी गुंतवणुकदारांना 68 टक्के इतका परतावा दिला आहे. बुधवारी 2.03 टक्के इतका समभाग घसरत 20 रुपयांवर खाली आला होता. गेल्या वर्षभरामध्ये हा समभाग 37 टक्के वाढलेला आहे. कंपनीचे बाजार भांडवलमूल्य 7736 कोटी रुपये झाले होते.









