मुंबई
मुकेश अंबानी यांच्या मालकीचा रिलायन्स इंडस्ट्रिजचा समभाग सोमवारी शेअरबाजारात तेजी दाखवताना दिसला आहे. सदरच्या कंपनीच्या समभागाने सोमवारी बीएसईवर इंट्रा डे दरम्यान 2 टक्के वाढत 2553 रुपयांपर्यंत मजला मारली होती. समभाग तसा पाहता 52 आठवड्यानंतर नवी उंची गाठत आहे. सलग तिसऱ्या सत्रात बाजारात रिलायन्सचा समभाग तेजीकडे वाटचाल करताना दिसतो आहे.









