मुंबई
प्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रिजचा समभाग सोमवारी शेअरबाजारात 1 टक्का इतका वधारताना दिसला. बीएसईवर सोमवारी कंपनीचा समभाग 1 टक्का वधारत 2460 रुपयांवर पोहचला होता. ऑक्टोबर ते डिसेंबरचा तिमाहीचा नफ्या-तोटय़ाचा निकाल कंपनीने घोषित केला असून कंपनीने त्यात चांगली कामगिरी केली आहे. याचा परिणाम कंपनीच्या समभागावर सकारात्मक पाहायला मिळाला. याआधी रिलायन्सचा समभाग बाजारात चांगली कामगिरी करु शकला नव्हता.









