मुंबई :
स्टील पाईप्सच्या निर्मितीत कार्य करणाऱ्या रामा स्टील ट्युब्सचे समभाग मंगळवारी शेअरबाजारात चमकताना दिसले. रामा स्टीलचे समभाग मंगळवारी बीएसईवर इंट्रा डे दरम्यान 7.92 टक्के इतके वाढत 42 रुपयांवर पोहचले आहेत. याआधीच्या सत्रात कंपनीचा समभाग 39 रुपये या भावावर बंद झाला होता. 10 जानेवारी 2023 रोजी या समभागाने 46 रुपयांचा उच्चांकी स्तर गाठला होता. कंपनीने जेएसडब्ल्यू स्टीलशी भागीदारी केल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.









