मुंबई
रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचा समभाग शुक्रवारी शेअरबाजारात चमकताना दिसला. कंपनीला नुकतीच एक ऑर्डर प्राप्त झाल्याने त्याचा सकारात्मक परिणाम समभागाच्या भावावर दिसला आहे. समभाग 115 रुपयांवर शुक्रवारी व्यवहार करत होता. कंपनीने बेंगळूर मेट्रो रेल्वेसंबंधीत 27 कोटी रुपयांची कामाची ऑर्डर प्राप्त केली आहे. यासोबत 2023 मध्ये कंपनीने आतापर्यंत एकंदर 3 कंत्राटे मिळवण्यात यश मिळवले आहे.









