मुंबई
जीडीएन इन्वेस्टमेंट यांनी 1 टक्का समभाग खरेदी केल्यानंतर प्रताप स्नॅक्स यांचा समभाग शेअरबाजारात मंगळवारी वधारताना दिसला आहे. सदरचा समभाग दोन सत्रात 30 टक्के इतका वधारल्याचे पाहायला मिळाले आहे. राष्ट्रीय शेअर बाजारात (एनएसई) इंट्रा डे दरम्यान 8 टक्के समभाग वाढत 1055 रुपयांवर पोहचला होता. अशाप्रकारे कंपनीच्या भावाने 52 आठवड्यानंतर उच्चांकी झेप घेतली आहे. जीडीएन इन्वेस्टमेंटने 20 नोव्हेंबर रोजी प्रताप स्नॅक्समधील 2,50,000 इतके समभाग खरेदी केले आहेत.









