मुंबई :
न्युजेन सॉफ्टवेअर या कंपनीचे समभाग सोमवारी शेअर बाजारात वधारताना दिसून आले. कंपनीचे समभाग सोमवारी शेअरबाजारात 4 टक्के वाढत 1430 रुपयांवर पोहोचले होते. जागतिक ब्रोकरेज फर्म, जेफ्रीजने कंपनीचा समभाग 1740 रुपयांवर पुढील काळात झेपावणार असल्याचा अंदाज वर्तविला आहे. मागच्या सत्राच्या तुलनेमध्ये कंपनीचा समभाग 1.05
टक्के एनएसईवर वाढला आहे. आगामी काळामध्ये कंपनीला भारतात व मध्य पूर्वेतील देशांकरिता चांगला व्यवसाय साध्य करण्याची संधी आहे.









