मुंबई :
झिरोदाचे संस्थापक निखील कामत यांनी गेमिंग टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रातील नझारा टेक्नॉलॉजीत 100 कोटी रुपये गुंतवले असून याचा सकारात्मक परिणाम कंपनीच्या समभागावर सोमवारी शेअरबाजारात पाहायला मिळाला. नझारा टेक्नॉलॉजीचा समभाग सोमवारी 52 आठवड्यानंतर उच्चांकी स्तरावर पोहचत 853 या भावावर बीएसईवर व्यवहार करत होता. कामत यांना वरीलप्रमाणे गुंतवणूकीचे समभाग देण्याबाबतच्या प्रस्तावाला नझाराच्या मंडळाने मान्यता दिली आहे.









