मुंबई
कॉमर्स क्षेत्रात कार्यरत नायका यांचा समभाग शेअरबाजारात शुक्रवारी 3 टक्के इतका वाढताना दिसला आहे. सदरची वाढ होण्यामागे सप्टेंबरमधील दुसऱ्या तिमाहीतील चांगल्या कामगिरीचे कारण सांगितले जात आहे. शेअरबाजारात नायकाचा समभाग इंट्रा डे दरम्यान 3 टक्के इतका वधारत 151 रुपयांवर पोहचला आहे. सप्टेंबरच्या तिमाहीत सौंदर्यसह इतर उत्पादनांना ग्राहकांनी चांगली मागणी नोंदवली असल्याचे दिसून आले आहे.









