मुंबई :
शुक्रवारी शेअरबाजारात अखेरच्या दिवशी धातु कंपन्यांचे समभाग चांगलेच वधारताना दिसले आहेत. शेअर बाजारात टाटा स्टील, हिंदुस्थान कॉपर, सेल यांचे समभाग 5 टक्क्यापर्यंत वाढले होते. पोलाद वापरात विविध क्षेत्रांकडून आर्थिक वर्ष 2024 मध्ये वाढ दिसून येत असून सरकारच्या पायाभूत सुविधांचाही धातू कंपन्यांना लाभ होताना दिसतो आहे. शुक्रवारी धातू निर्देशांक 52 आठवड्याच्या उच्चांकी स्तरावर पोहचत 6844 अंकांवर व्यवहार करत आहे.









