मुंबई
माझगाव डॉक कंपनीचे समभाग सध्याला तेजीत असून 6 सप्टेंबरपासून आजवर हा समभाग 19 टक्के इतका वधारला असल्याची माहिती दिली जात आहे. 11 सप्टेंबरला समभाग 2271 रुपयांवर पोहचला होता, जो 6 सप्टेंबरला 1905 रुपयांवर व्यवहार करत होता. तर 8 सप्टेंबरला समभागाचा भाव 2483 रुपयांवर पोहचला होता. 2023 मध्ये पाहता या समभागाने गुंतवणूकदारांना 167 टक्के इतका परतावा दिला असल्याची माहिती आहे.









