मुंबई
ट्रॅक्टरसह विविध वाहन उद्योगात असणाऱ्या महिंद्रा आणि महिंद्रा कंपनीचे समभाग शुक्रवारी अखेरच्या दिवशी शेअरबाजारात वधारताना दिसले. याचदरम्यान कंपनीने बाजार भांडवल मूल्यात 2 ट्रिलीयनचा महत्त्वाचा टप्पा गाठण्यातही शुक्रवारी यश मिळवलं आहे. कंपनीचा समभाग शुक्रवारी बीएसईवर इंट्रा डे दरम्यान 3 टक्के इतके वाढत 1610 रुपयांवर पोहचले आहेत. समभागाने अशाप्रकारे नवा उच्चांकी भाव प्राप्त केला आहे. गेल्या दोन सत्रात समभाग 5 टक्के इतका वाढला आहे.









